न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२५) :- पंतप्रधानांच्या उज्वला गॅस योजनेत केंद्र सरकारने ५० रुपयांनी दरवाढ केल्याने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध करण्यात आला. चुलीवर भाकरी थापून अनोख आंदोलन करण्यात आलं. ‘मोदी सरकार हाय – हाय’ च्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या यांनी तीव्र शब्दात मोदी सरकार चा निषेध केला आहे.
















