न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ एप्रिल २०२५) :- देहूरोड ते देहूगाव मार्ग शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहे. देहूरोडदरम्यान ‘सीओडी’ डेपोजवळ असलेल्या लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
त्यामुळे देहूतील परंडवाल चौक ते देहूरोड या मार्गावर वाहतूक शनिवार (दि. १९) दुपारी एक वाजेपासून ते रविवारी २० एप्रिलपर्यंत सायंकाळी ७ वाजे दरम्यान बंद राहणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे कळविण्यात आले आहे.
हा रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नमूद कालावधीत वाहनधारकांनी देहू ते तळवडेमार्गे निगडी, देहूरोडकडे यावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.
















