- पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा इशारा; ४२ मोटारी जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२५) :- महापालिका पाणीपुरवठा विभागाने विद्युत मोटारीने पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई तीव्र केली आहे. शहरात गुरुवारी (दि.१७) वेगवेगळ्या भागात कारवाई करून ४२ मोटारी जप्त केल्या आहेत.
त्याकरिता महापालिका शहरात तपासणी करणे, विद्युत मोटारी जप्त करणे, बेकायदा नळजोडांवर कारवाई करणे आणि अधिकाधिक नळजोड अधिकृत करण्यासाठी मोहीम राबवत आहे.
त्याचा भाग म्हणून चिंचवडेनगर येथील बळवंतनगर, शिवनगरी भागात २१ विद्युत पंप, रहाटणी परिसरातील अमृतवेल कॉलनी भागात थेट नळाला जोडलेले ११ विद्युत पंप, चिखली मोरे वस्ती भागातील भावेश्वरी व श्री कुंज कॉलनी भागात १० विद्युत पंप जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये पाणी कमी येत असल्याच्या तक्रारी अनेक भागातून प्राप्त होतात. त्यामुळे विद्युत मोटारी लावून पाणी खेचणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी मोटारी वापरू नयेत. तसेच शहरवासियांनी पाणी बचत करावी. नळाला मोटारी लावल्यास कारवाई करण्यात येईल
-प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता












