न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२५) :- महापालिकेने १ एप्रिलपासून ई-ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. त्यांतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार बिल ऑनलाइन पद्धतीने होतात. या ऑफिस प्रणालीचा फटका महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसला आहे.
माहिती तंत्रज्ञान, सामान्य प्रशासन आणि लेखा व वित्त विभाग यांच्या गोंधळात कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. एप्रिल महिन्यातील १६ तारीख उलटूनही पगार न झाल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त करीत आहेत. एक तारखेला पगार होत असल्याने अनेकांचे हप्ते ३ ते ६ तारखेला बँक खात्यातून वजा होतात. मात्र, पगारच झाला नसल्याने अनेकांचे हप्ते वेळेवर गेले नाहीत. परिणामी बँकांकडून दंड करण्यात आला आहे.
नवीन सिस्टीममध्ये बिले काढण्यासाठी सांगण्यात आले होते. ज्यांनी ते लवकर दिले त्या विभागाचे पगार लवकर झाले. काही विभागांना अडचणी आल्या आहेत.
– नीळकंठ पोमण, मुख्य कार्यकारी अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान विभाग…















