न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२५) :- दिघी रस्त्यावरील संत निरंकारी भवनाजवळ जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता सोमवारपर्यंत (दि. २१) रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी दिघीकडे ये-जा करण्यासाठी आळंदी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.
दिघी रस्त्यावरील गंगोत्री पार्कमधील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) सीमा भिंतीपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेने यापूर्वीच पूर्ण केले आहे. मात्र, गंगोत्री पार्क जवळील काम करणे अपूर्ण होते. ते आता सुरू करण्यात आले आहे. सहाशे मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी येथे काम सुरू करण्यात आले आहे.
गंगोत्री पार्क ते संत निरंकारी भवनासमोरील रस्त्यावर जलवाहिनी टाकणे सुरू करण्यात आले आहे. यासाठी भोसरी-दिघी रस्ता बंद करण्याची परवानगी यापूर्वीच घेतली आहे. हे काम येत्या तीन दिवसांत पूर्ण होईल.
– शेखर गुरव, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय…












