न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०२५) :- मोशी येथे साकारत असलेल्या पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची भाजपा कायदा आघाडीच्या वकिलांनी पाहणी केली. कायदा आघाडी शहराध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, महिला अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने, युवा अध्यक्ष हर्षद नढे, सरचिटणीस अॅड. गोरख कुंभार, वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. मंगेश लाहोरे, अॅड. सोपान पाटील, अॅड. रोहित चिंचवडे, अॅड. दिनकर शिंदे, अॅड. विकास नेवाळे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.
अॅड. झोळ यांनी सांगितले की, इमारतीचे बांधकाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, परंतु कामाचा वेग वाढविण्याची गरज आहे. या कामाचा अहवाल आमदार शंकर जगताप यांना दिला असून ते हा अहवाल मुख्यमंत्री तथा विधी व न्याय मंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी आमदार जगताप यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे.











