- चिंचवडगावातील चापेकर पुतळ्यासमोर भयानक दहशतवादी घटनेचा शिवसेनेकडून निषेध..
- ही सामान्य दहशतवादी घटना नाही – शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. यात २८ जणांचा मृत्यू झाला. २४ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पर्यटक मुस्लिम नसल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवडगावातील चापेकर पुतळ्यासमोर या भयानक दहशतवादी घटनेचा बुधवारी (दि. २३) निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान शिवसैनिकांनी खोऱ्यात पुन्हा डोके वर काढण्याचे धाडस करणाऱ्या या धार्मिक दहशतवादाचा पूर्णपणे नाश करण्याची आता वेळ आली आहे. मोदी सरकारने याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले पाहिजे. या निष्पाप हिंदू प्रवाशांच्या हत्येचा बदला घेतला पाहिजे. दहशतवादाचे दिवस पुन्हा येऊ नयेत याची खात्री केली पाहिजे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषनेणे परिसर दणाणून गेला होता.
यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते, पिंपरी चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, युवा सेना शहरप्रमुख माऊली जगताप, शिल्पा सुधीर आणपान, प्रशांत कडलग, मीनाताई डेरे, अॅड. दिलीप पाटील, प्रतिमा पांडे, नारायण लांडगे, सुनीता चंदने, हरिनारायण डोंबळे, शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा प्रमुख निखिल येवले, शैला पाटील, दिलीप कुसाळकर, सायली साळवी, शीला भोंडवे, युती शहर प्रमुख रितू कांबळे, संतोष सौंदणकर, सागर शिंदे, उपजिल्हाप्रमुख दिलीप वाडकर, उपजिल्हा प्रमुख खंडू शेठ चिंचवडे, महादेवराव पाटील, युवा सेना चिंचवड वि.प्रमुख मंदार येळवंडे, प्रदीप मोरे, जनाताई गिजरे, शंकर पाटील, हेमचंद्र जावळे, सुदर्शन देसले, अॅड. मुकुंद ओव्हाळ, अनिल राऊत, रामशेज यादव, विश्वनाथ शिंग, सुरेंद्र प्रसाद, सुधीर आणपाव, अनिल धोंडीबा राऊत आदी उपस्थित होते.
शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे म्हणाल्या, ‘दहशतवाद्यांनी ४० पर्यटकांना घेरुन आधी त्यांची नावे विचारली आणि विशिष्ट धर्मीय नावे असलेल्या पर्यटकांना गोळ्या घातल्या. यामुळे संपूर्ण देश संतप्त आहे. ही सामान्य दहशतवादी घटना नाही तर, पाकिस्तानने भारताविरुद्ध उघड युद्धाची घोषणा केली आहे. इस्लामिक जिहादी पाकिस्तान आणि त्यांच्या काश्मिरी स्लीपर सेल्सविरुद्ध कठोर कारवाई करावी.











