न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२५) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार, दिनांक २४ एप्रिलला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम गुरुवारी सकाळी आठ ते रात्री बारा यावेळेत केले जाणार आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमड़, आरएनडी दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, एमइएस औंध या भागात पाणीपुरवठा केला जातो.
दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाणी पुरवठा पूर्ण बंद राहून शुक्रवारी, शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने, अपुरा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने दिली आहे.











