न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या (३० एप्रिल) ते (७मे) आठ दिवसांच्या रजा कालावधीत महापालिकेचा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्याकडे असणार आहे.
त्याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. महापालिका आयुक्त सिंह हे फ्रान्स देशातील पॅरिस शहरामध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. त्याबाबत त्यांनी नगरविकास विभागाकडे रजेसाठी अर्ज केला होता.
त्यानुसार आयुक्त आठ दिवस पर्यटनासाठी रजेवर आहेत. हा त्यांचा खासगी दौरा आहे. त्यांच्या रजा कालावधीत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील हे महापालिकेचा कार्यभार सांभाळणार आहे.
















