न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- चिंचवड येथील श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे श्री फत्तेचंद जैन विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य, कला आणि MCVC तील विद्यार्थ्यांनी यंदाही बारावीच्या निकालाची यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
शाळेच्या विज्ञान शाखेतील मुदुली प्रियांका लक्षीधर या विद्यार्थिनीने ८६.५० टक्के गुण मिळवीत प्रथम तर, शिवगन प्रज्वल सुधाकर ८५.५०, आवारे आर्य गोकुळदास ८५.१७ टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे.
वाणिज्य शाखेतील पोद्दार नयना राकेश या विद्यार्थिनीने ९२.८३ टक्के गुण मिळवीत प्रथम तर, ८८.५ टक्के गुण मिळवीत शेख सायेमा वसीम आणि परमार जया पन्नाराम ८६.५० टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेतील कांबळे प्रियांका जालिंदर या विद्यार्थिनीने ७७.१७ टक्के गुण मिळवीत प्रथम तर, ७५.१७ टक्के गुण मिळवीत अन्सारी इजाज अकबर आणि चौधरी पूजा शेषराम ७० टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे.
एमसीव्हीसी शाखेतील चौगुले प्रतिक उमेश या विद्यार्थ्याने ७२.६७ टक्के गुण मिळवीत प्रथम तर, ५६.३३ टक्के गुण मिळवीत श्रीवास्तव मोहित बिरेंद्र आणि मुल्ला उमर मोहम्मद रफिक याने ५७.५ टक्के गुण मिळवीत अनुक्रमाने द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला आहे.