- दीर्घकालीन व्हिजा धोरणात बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ मे २०२५) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हददीत दिर्घकालीन व्हिजा (LTV) वर वास्तव्य करणाऱ्यां पाकिस्तानी नागरिकांनी १० मे २०२५ पासून ई- एफ आर आर ओ पोर्टल व्दारे (https://indianfrro.gov.in) पुन्हा ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.
गृहमंत्रालय भारत सरकारने दिर्घकालीन व्हिजाबाबत (LTV) धोरण निश्चित केलेले आहे. पुन्हा अर्ज करण्यासाठी वैध दिर्घकालीन व्हिजाची प्रत, अलिकडील पासपार्ट आकाराचा फोटो (पांढरा पार्श्वभुमी), नवीनतम निवासी पत्त्याच्या पुराव्याची प्रत, व्यवसाय आणि धर्म सिद्ध करणारे तपशिल, जर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज सादर केला असेल तर अर्जाची प्रत ही कागदपत्र आवश्यक आहेत.
दिर्घकालीन व्हिसा साठी पुन्हा अर्ज करण्यासाठीचे अर्ज दिनांक १०/०५/२०२५ पासुन (https://indianfrro.gov.in) या पोर्टलवर दिनांक १०/०७/२०२५ पर्यंत उपलब्ध असेल. त्या कालावधीत पुन्हा अर्ज केले नाही तर सदरहु पाकिस्तानी नागरिकांचा दिर्घकालीन व्हिसा रद्ध करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.











