- किरकोळ कारणावरून दोघांनी केला तरूणाचा खून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. 09 मे 2025) :- चिखलीमध्ये हत्या झालेल्या महेश चामे नामक व्यक्तीच्या मारेकरऱ्यांना अवघ्या १२ तासात चिखली पोलीस स्टेशनकडील डी. बी. पथकाने ताब्यात घेतले आहे. सिगारेट व माचीस न दिल्याने दोघांनी मयत चामे याची हत्या केल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली आहे.
दरम्यान (दि. ०८) रोजी सकाळी ०९.०० वाजताचे सुमारास शरदनगर, स्वामी विवेकानंद भुयारी मार्गाचे वरील बाजुस, दोन्ही स्पाईन रोडच्या मध्यभागी असलेल्या मनपाच्या मोकळया जागेत, चिखली या ठिकाणी हा प्रकार घडला होता.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाच्या गुन्हयातील आरोपी हे मोरवस्ती, मोरया कॉलनी, न्यु गोल्डन बेकरीच्या पाठीमागे, पत्र्याचे शेडमध्ये बसलेले आहेत अशी बातमी मिळाल्याने पोलीसांनी सापळा रचुन तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि, आम्ही तिघे दारु पित बसलो होतो. तसेच आमचेपासुन थोड्या अंतरावर एक व्यक्ती दारु पित बसली होती. त्यास आम्ही सिगारेट व माचीस मागितली असता त्याने दिली नाही. तेव्हा आमचेत बाचाबाची झाली. त्यावेळी आम्ही आमचेजवळील कोयत्याने त्याचे चेह-यावर, डोक्यावर व छातीवर वार केल्याचे सांगितले. नमुद बालकांकडुन गुन्हा करण्यासाठी वापरलेला एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे चिखली पोलीस ठाणेकडील तपास पथकाने अवघ्या १२ तासाचे आत खुनाचा गुन्हा उघडकीस आणुन तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन त्यांना निरीक्षणगृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे.
कामगिरी विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त, डॉ. श्री. शिवाजी पवार पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, राजेंद्रसिंग गौर, सहा. पोलीस आयुक्त, चाकण विभाग अति. कार्य. भोसरी एमआयडीसी विभाग, विठ्ठल साळुंखे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, अमोल फडतरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चिखली पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राम गोमारे, सहा. फौज. राजु जाधव, पो.हवा. ८०३ चेतन सावंत, पो.हवा १२४५ विनोद व्होनमाने, पो.हवा १८१३ सुरज सुतार, पो.हवा १८५६ कबीर पिंजारी, पो.हवा. १८६८ अरुण साबळे, पो.हवा.२९३१ भास्कर तारळकर, पो.हवा. १६०७ संतोष भालेराव, पो.हवा. ४७८ बाबासाहेब गर्जे, पो.हवा. पो.शि.२६४२ संतोष सपकाळ, पो.शि.२४४७ नारायण सोमवंशी, पो.शि. ३३८९ संतोष भोर यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.












