- दहावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 12 मे 2025) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे.
बोर्डाची पत्रकार परिषद मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.
कुठे आणि किती वाजता बघता येणार निकाल ?..
बोर्डाकडून तीन अधिकृत संकेतस्थळांवर निकाल जाहीर केला जाणार आहे. mahresult.nic.in, results.gov.in, DigiLocker यासह विद्यार्थ्यांना
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results या संकेतस्थळावर देखील निकाल पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवरून विषयानुसार (SSC Result) गुण पाहता येतील व त्याची प्रिंट घेण्याचीही सुविधा असेल. शाळांसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर ‘स्कूल लॉगिन’मध्ये एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे. निकालाबाबत सविस्तर माहिती बोर्डाकडून मंगळवारी ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.