न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०२५) :- त्रिरत्न बौद्ध महासंघ,पिंपरी केंद्राच्या वतीने नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या धम्मानुस्मृती विहाराचे उद्घाटन अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाले. या धम्मविहाराच्या नूतनीकरणासाठी लागणारा संपूर्ण निधी आमदार अमित गोरखे यांच्याकडून मंजूर करण्यात आला.
सदर धम्मविहाराची मूळ संकल्पना सन १९९२ मध्ये साकारण्यात आली होती. तब्बल ३३ वर्षांनंतर, नव्या रूपात व आधुनिक सुविधांनी सज्ज धम्मविहार पुन्हा एकदा समाजाच्या सेवेसाठी खुला करण्यात आला आहे. धम्मप्रिय बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग व त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून हा उपक्रम समाजासाठी अत्यंत फलदायी ठरल्याचे मा. आमदारांनी आपल्या भाषणात नमूद केले.
“हे केवळ विकासकाम नाही, तर धम्मासाठीचे माझे सामाजिक कर्तव्य आहे असे मा.आमदारांनी यावेळी सांगितले. धम्मविहाराच्या माध्यमातून भावी पिढीला बौद्धिक प्रबोधन, नैतिक शिक्षण व समतेचे मूल्य रुजवण्याचे कार्य अखंड सुरू राहील, हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
















