- वाकड पोलीस ठाण्याची कामगिरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२५) :- नागरीकांचे गहाळ, चोरी झालेले सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे १३७ मोबाईल फोन महाराष्ट्रासह, परराज्यातून हस्तगत करून नागरिकांना परत केले. ही कामगीरी वाकड पोलीस ठाणे यांनी केली आहे. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये विशेष मोहिम राबविण्याबाबत आदेशीत केले.
तसेच यापुर्वीही डिसेंबर 2024 मध्ये वाकड पोलीस स्टेशन कडुन २० लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे मागिल सहा महिन्यात सुमारे ६० लाख रूपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे व महागडे २५७ मोबाईल परत देण्यात आले. यापुढेही अशाच प्रकारे मोबाईल हस्तगत करून परत देण्याची मोहिम चालु आहे.
कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. शशीकांत महावरकर पोलीस सह आयुक्त, सारंग आवाड अपर पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड पोलीस उप आयुक्त, परि-२, सुनिल कुराडे सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांचे मार्गदर्शना खाली वाकड पोलीस ठाणेकडील निवृत्ती कोल्हटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.नि. गायकवाड, स.पो.नि. सुभाष चव्हाण, पोलीस अंमलदार शहाजी धायगुडे व प्रिया पवार यांनी केली आहे.














