न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२५) :- फेडेक्स कस्टमर केअरवरुन फोन केला. पार्सल इरानमध्ये चालले होते, त्याच्यामध्ये एक्स् पासपोर्ट, लॅपटॉप, मेडीसीन व ४५० ग्रॅम एम.डी.एम.ए. ड्रग्स हे मुंबई एअरपोर्टला जप्त केले आहे. त्यावरुन तुमच्या नावावर गुन्हा दाखल करणार, अशी धमकी महिलेला दिली.
सरकारी अधिका-यांची नावे सांगुन, महिलेच्या मोबाईलमध्ये ICICI BANK या क्रमांकावर असलेले “I” मोबाईल अँप मधुन फिर्यादीला स्वत:चे नावे २० लाख रुपयाचे पर्सनल लोन घ्यायला लावुन ते लोनचे पैसे SBI BANK ACC।यावर भरावयास लावुन महिलेची २० लाख रु. आर्थिक फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार २०२४ ते दि.०४/०६/२०२५ रोजीपर्यंत मामुर्डी, देहुरोड येथे ऑनलाईनद्वारे घडला. महिला फिर्यादीने आरोपी संपर्क नंबर वरील ९२३०७४४८६९ अज्ञात इसम व SBI BANK ACC NO.-४३३०८१२६४७१।बँक खातेधारक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहुरोड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.












