न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २३ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचा दणदणीत मतानी पराभव केला आहे.
खा. बारणे यांनी पार्थ पवार यांचा दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव करून, पून्हा एकदा मावळात शिवसेनेचीच ताकद असल्याची जाणीव विरोधकांना करून दिली आहे. पार्थ पवार यांच्या विजयासाठी पवार कुटुंबीयांनी कसून तयारी केली होती.
मात्र, पार्थ पवार यांना जवळपास पाच लाख मते मिळाली. तर खा. बारणे यांना सात लाखांच्यावर मते मिळाली आहेत. अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाकडून जाहीर होण्यास विलंब होणार असला तरी, खा. बारणे यांनी मावळचे मैदान मात्र, काबीज करून राष्ट्रवादीला जोरदार चपराक दिली आहे.











