न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०७ जून २०२५) :- देहू नगरपंचायतीच्या विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी बिनविरोध पार पडली. यामध्ये महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी रसिका काळोखे, बांधकाम समितीच्या सभापतीपदी आदित्य टिळेकर, स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रियांका मोरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी सुधीर काळोखे आणि स्थायी समितीच्या सभापतीपदी पूजा दिवटे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी स्मिता चव्हाण, शीतल हगवणे, ज्योती टिळेकर, बांधकाम समितीच्या सदस्यपदी ज्योती टिळेकर, योगेश परंडवाल, योगेश काळोखे, मयूर शिवशरण, स्वच्छता वैदयक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्यपदी स्मिता चव्हाण, मयूर शिवशरण, योगेश काळोखे, योगेश परंडवाल, पाणीपुरवठा जलनिस्सारण व समितीच्या सदस्यपदी पूनम काळोखे, योगेश काळोखे, मयूर शिवशरण आणि योगेश परंडवाल, स्थायी समितीच्या सदस्यपदी प्रियांका मोरे, रसिका काळोखे, सुधीर काळोखे आणि आदित्य टिळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
या समितीच्या सभापती व सदस्य पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी जयवंत माने यांच्या उपस्थित झाली. प्रांताधिकारी डॉ. जयवंत माने, मुख्याधिकारी चेतन कोंडे, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका कदम, रामदास भांगे, महेश वाळके यांच्या उपस्थित ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.