- घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०९ जून २०२५) :- महाराष्ट्र निवडणुकीत जो स्कॅम भाजपने केला आहे तोच बिहार विधानसभा निवडणुकीत करण्याची त्यांची तयारी आहे. त्यासोबत महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम होते, तर अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी होते. निवडणुका झाल्यानंतर किरण कुलकर्णीची तडकाफडकी मराठी भाषा विभागात बदली का करण्यात आली, असा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हर्षवर्षन सपकाळ म्हणाले, राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. भाजपवर त्यात थेट आरोप नव्हता. लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ प्रश्न उपस्थित केले. निवडणूक झाल्यापासून राहुल गांधी या मुद्याचा पाठपुरावा करीत आहेत. निवडणूक आयोगाने यावर उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र, याची उत्तरे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा देत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आज लेख लिहिला आहे. गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा लेख लिहिला आहे. तुम्हीच आरोपी आहात आणि तुम्हीच लेख लिहित आहात, असा आरोप केला आहे.
देवेंद्र फडणवीस तुम्ही गडचिरोलीला कशाला जातात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण तिथे खाणी आहेत. तिथे आर्थिक हित जपण्यासाठी तुम्ही जाता. आधी म्हणाले, वेगळा विदर्भझाल्याशिवाय लग्न करणार नाही. दुसरे खोटे राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. मात्र आता त्यांनी मिक्सिंग, मिक्सिंग, मिक्सिंग केले आहे. ते केवळ क्लीन चीट देण्यात पटाईत आहेत. नारायण राणे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले. पुढे काय झाले, त्यांना क्लीन चीट दिली. त्यानंतर अजित पवारांवर आरोप केले, मात्र त्यांच्यासोबतच ते आहेत. नंतर छगन भुजबळ यांचेदेखील उदाहरण आहे. आता लेख लिहून निवडणूक आयोगालादेखील क्लीन चीट दिली आहे. देवेंद्र फडणवीस ज्यांची बाजू घेतात त्यावेळी लक्षात घ्यावे दाल में कुछ काला है, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.