- सायबर पोलिसांनी अ. नगरमधून घेतलं ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२५) :- डिजीटल अरेस्ट केल्याचे भासवत एकाची ५२,५९,००० रुपयांची आर्थिक फसवणुक करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अहिल्यानगर येथून अटक केली आहे. आकाश बाबासाहेब पठारे (वय २८ वर्ष, रा. बोल्हेगाव, आहिल्यानगर) याने अविनाश तुंगार, शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा उर्फ जितु भगत याच्यासह गुन्हा केल्याचे सांगितलं. ते तीघेही बोल्हेगाव, आहिल्यानगर येथिलच असल्याचे सांगीतले. परंतु, आकाश पठारे यास ताब्यात घेतल्यानंतर अविनाश तुंगार, शुभम उर्फ विकी देठे व कृष्णा भगत यांनी त्याचा फोन बंद केला होता. त्यानंतर तेथिल स्थानिक संपर्काव्दारे आरोपीचा शोध घेतला असता अविनाश तुंगार हा गाव सोडुन पळुन जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानंतर तेथिल स्थानिक रस्त्यावर सापळा रचुन अविनाश तुंगार यास ताब्यात घेण्यात आले आहे. दाखल गुन्हयात आकाश बाबासाहेब पठारे रा. बोल्हेगाव, आहिल्यानगर व अविनाश श्रीकांत तुंगार रा. बोल्हेगाव, आहिल्यानगर यांचा गुन्हयात सहभाग असल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा अधिक तपास पो.नि रविकिरण नाळे, सायबर पोलीस ठाणे, हे करीत आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि प्रविण स्वामी, पोउपनि प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार, अतुल लोखंडे, हेमंत खरात, दिपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्निल खणसे, महेश मोटकर, ज्योती साळे, वैशाली बर्गे, सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
काय असते डिजीटल अरेस्ट..
व्यक्तींना एखादया अनोळखी नंबरवरुन पोलीस, न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड, व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करुन त्यांच्या नावानी मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याची सांगुन त्यांना भिती घातली जाते. तसेच आरोपी हे व्यक्तींना व्हिडीओ कॉलव्दारे सुध्दा संबंधीत व्यक्ती हे तेच असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे व्यक्तींना त्यांच्यावर विश्वास बसते. त्यानंतर आरोपी हे व्यक्तींना त्यांच्या अकाऊंटवर असलेले सर्व पैसे त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यासाठी सांगुन फसवणुक केली जाते.
जनतेला आवाहन…
पोलीस, न्यायाधिश, सीबीआय, ऑडीटर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडीया, फायनान्स डिपार्टमेंट हेड, व सेक्रेटरी ऑफ मिनीस्ट्री अशा वेगवेगळया नावांनी संपर्क करुन मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल असल्याचे सांगुन पैसे ट्रान्सपर करण्यास सांगत असतील तर जवळच्या सायबर पोलीस ठाणेशी संपर्क करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दया किंवा १९३० या टोल फ्रि नबरवर तक्रार दयावी.