- चाकण आणि मावळ तालुक्याचा त्यात समावेश करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा जाहीर करून, त्यात चाकण व मावळ या विभागांचा समावेश करावा. तरच या भागांचा समन्वित आणि शाश्वत विकास साधता येईल, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील एक वेगाने वाढणारे आणि औद्योगिक व शहरी दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे शहर ठरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांकडून सातत्याने होत आहे. २०१८ साली पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. ही एक स्वागतार्ह बाब होती. पिंपरी चिंचवड शहराला लगतच मावळ तालुका आणि चाकण औद्योगिक परिसर आहे. चाकण हे एक मोठे औद्योगिक केंद्र असून, भारतभरातून लोक येथे नोकरी व उद्योगाच्या संधींसाठी येत आहेत. परंतु, या भागात स्वच्छ हवा, पाणी, स्वच्छता, ट्रॅफिक व्यवस्थापन अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
याउलट, मावळ तालुका हा निसर्गसंपन्न आणि पर्यटनदृष्ट्या महत्वाचा आहे. देशभरातून पर्यटक येथे येतात, परंतु योग्य नियोजनाच्या अभावामुळे त्या भागाचा पुरेसा विकास झालेला नाही. चाकण व मावळ या दोन्ही विभागांच प्रशासन पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवडद्वारेच हाताळले जात असल्यामुळे, हे भाग पिंपरी चिंचवडच्या प्रशासकीय कक्षेतच येतात, हे स्पष्ट होते. त्यामुळे या भागांचा पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यात समावेश करणे नैसर्गिक व योग्य ठरेल.
पिंपरी चिंचवड शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला गेला आणि त्यात चाकण व मावळ यांचा समावेश झाला, तर औद्योगिक व पर्यटन विकासाला नवी गती मिळेल,
स्थानिक नागरिकांना मूलभूत सुविधा आणि प्रशासनिक सेवा सुल