न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- श्रावण महिन्यात साजरी होणाऱ्या कानबाई माता उत्सवा निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील खान्देश बांधवांची महत्वपूर्ण बैठक खान्देश मराठा मंडळ येथे संपन्न झाली. यंदाचा कानबाई मातेचा उत्सव एकत्रितपणे शहरात सार्वजनिक रित्या साकारण्याचे सर्वानुमते ठरले. बैठकीस २५ खान्देश समाज बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी सामान्य न्यूनतम कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष अँड हेमंत चव्हाण, माजी नगरसेवक नामदेव ढाके, राजेंद्र साळुंखे, माउली जगताप, दादाजी पगार, उमेश बोरसे, अन्ना सावंत, नोहर पाटील तसेच डॉ. विजयकुमार पाटील या प्रमुख उपस्थितांनी पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व समाज मंडळांना संपर्क करून त्यांना उत्सव समितीमध्ये सामावून घेण्याची जबाबदारी माउली जगताप व प्रदीप पटेल यांचेकडे सोपविण्यात आली.
या बैठकीमध्ये खान्देश बांधव जितेंद्र पाटील, राजेंद्र देसले, गौतम बागुल, प्रल्हाद पाटील,राहुल पाचपांडे, संदीप जगताप, जितेंद्र नारायण पाटील,राजेंद्र निकम,युवराज अहिर,रितेश चौधरी,अविनाश अहिरे,अजय पाटील,सचिन माळी, दत्त ढोणे, विकास पाटील उपस्थित होते.
खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष अँड. हेमंत चव्हाण यांनी सामान्य न्यूनतम कार्यक्रम ठराव मांडला. उपस्थित सर्व खान्देश बांधवांनी सहिनीशी त्यास सर्वानुमते संमती दिली.