न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातील संध्याकाळचा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. १२) रोजी बंद राहणार आहे. दुस-या दिवशी शुक्रवारी (दि. १३) रोजी सकाळचा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होईल. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे केले आहे.
वेळोवेळी पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील से.क्र. २३ येथील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक कामे तसेच क्षेत्रीय स्तरावरील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य विषयक तसेच विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक आहे.
त्यासाठी निगडी जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.