न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०२५) :- परताव्याचे आमिष दाखवुन फिर्यादी यांची बत्तीस लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. FYERS Pick Strategy या व्हॉट्स ग्रुपच्या व तसेच एच.एन.डब्ल्यु.ए.सी.सी. या ट्रेडींग अॅपचे माध्यमातुन गुंतवणुक करण्यास सांगत ही फसवणूक करण्यात आली आहे.
हा प्रकार दि १८/०५/२०२५ रोजी ते ०४/०६/२०२५ रोजी पर्यंत काटे वस्ती, पिंपळे सौदागर येथे घडला. समीर आपटे (वय ५५ वर्ष, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी FYERS PickStrategy या व्हॉट्स अप ग्रुपचे अॅडमिन धारक व व्हॉटसअॅप नंबर ७०५८२७६६३७, ९१०९४५०७४८ व ८४२७०६१०१९ (इसम नामे शेरॉन त्रिवेदी या नावाने असलेल्या) धारका विरोधात व तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे खाते क्रमांक ५७७२६८९५९५,५७०४०७८६७५,३७६६१२२१६५ याचे खातेधारक, आय.डी.एफ.सी. बँक, खाते क्रमांक १०२२६६०३१९१ याचे खातेधारक व बंधन बैंक, खाते क्रमांक २०१०००४८८६०७५१ याचे खातेधारक यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
त्यानुसार आरोपींच्या विरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.














