- पती मोकाट; विवाहितेच्या वडिलांची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दिघी (दि. १० जून २०२५) :- दिसायला चांगली नाही म्हणुन ३२ वर्षीय विवाहितेला हिनवले. वेळोवेळी भांडण करुन तिला शिविगाळ, दमदाटी, मारहाण केली. माहेरवरुन पैशासाठी दबाव टाकून फ्लॅटसाठी पैसे तसेच आर्थिक अडचणीसाठी जूने, वापरते सोने घेवून गहाण ठेवले.
तिला मानसिक, शाररिक त्रास देवून छळ केला. त्यातून विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. मयत विवाहितेच्या पतीने तिला मयत होण्यास प्रवृत्त केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१९ ते दि ०३/०६/२०२५ दरम्यान पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी, भाडयाने राहत असताना तसेच च-होली येथे घडला.
मयत विवाहितेचे वडिल फिर्यादी शिवाजी संपतराव सूर्यवंषी (वय ५६ वर्षे) यांनी आरोपी नरसिंह वामनराव माने (वय ३३ वर्षे रा. च-होली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.


















