- सायबर पोलिसांनी तिघांना केली दिल्ली-हरियाणा बॉर्डरमधून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :- Shaadi.com वेबसाईटवरुन महिलेशी संपर्क साधुन लग्नाचे अमिष दाखवले. महिलेची ०३ कोटी १६ लाख रुपयाची आर्थिक फसवणुक केली. त्यातील तिघांना दिल्ली-हरियाणा बॉर्डर येथुन पिंपरी चिंचवडच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
१) रणजीत मुन्नालाल यादव (वय २७ वर्षे, रा. सुकरा बाजार, मंडी गांव, पोस्ट जोनापुर दिल्ली), २) सिकंदर मुन्ना खान (वय २१ वर्षे, पत्ता सुकरा बाजार, मंडी गांव, पोस्ट जोनापुर दिल्ली), ३) बबलु रघुवीर यादव (वय २५ वर्षे पता -२६१, सुकरा बाजार मंडी गांव, पोस्ट जॉनपुर, दक्षिण दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
वेबसाईटवरुन ओळख करुन, लग्नाचे आमिष दाखवून महिलेचा विश्वास संपादन केला. कंपनीमध्ये CEO/Managing Director असल्याबाबत महिलेला सांगीतले होते. त्याने त्याच्या गोल्ड माइनिंग बिजनेस प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम आला असुन, त्यास आता नविन बिझनेस रॉ मटेरियल करीता महिलेकडे पैशाची मागणी केली होती. महिलेने आरोपीस पैसे दिले होते. त्यानंतर दुबई येथे BANK खाते रेग्युलराईज करण्यासाठी, त्याच्या आजारपणाचे उपचारासाठी, लोकांकडुन घेतलेले कर्ज फेडण्याकरीता, कस्टम क्लिअरंसची रक्कम, दुबई ते दिल्ली या प्रवासाचा एकुण खर्च, प्रतिनिधी म्हणून काम केल्याचे पैसे त्याच्या व्हेनेझुएला ते दुबई प्रवासाचा खर्च, त्याला टर्की-इस्तांबुल एअरपोर्ट येथे डिटेन केल्यानंतर रिलीज करण्यासाठी पैसे अशी वेगवेगळी कारणे सांगुन एकुण रक्कम ३,१६,७८,११३/- रुपये विविध बँक खात्यावर स्वीकारुन ते परत न करता महिलेची आर्थिक फसवणुक केली.
तपासा दरम्यान सायबर पोलीसांनी एकुण ४०० ते ५०० बँक अकाऊंटची पडताळणी केली. जास्तीत जास्त अकाऊंट हे दिल्ली येथिल असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस पथक दिल्ली येथे आरोपीचा शोध घेणेकरीता गेले होते. त्यांनी दिल्ली येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता यातील आरोपी यांनी वेगवेगळ्या बँकेमध्ये एकुण ११ खाते एकाच पत्त्यावर काढले होते. तसेच सदरचे पत्त्यावर नमुद आरोपी ०२ वर्षापुर्वी भाडेतत्त्वावर राहत होते. तसेच आरोपी यांनी त्यांचे मोबाईल नंबर बदलले होते. व्यवहाराना तब्बल ०२ वर्षाचा कालावधी झाला असल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले होते. तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी सिकंदर यास दिल्ली हरियाणा बॉर्डरवरील मांडी व्हिलेज, दक्षिण दिल्ली याठिकाणी ताब्यात घेण्यात आले. तद्नंतर नमुद आरोपी यांना अंकाउट उघडण्यास लावुन सदरची खाती दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी यांना पुरवणारा सख्ख्या भाउ रणजीत व बबलु यांना देखील सदर गावामधुन ताब्यात घेण्यात आले.
दाखल गुन्हयातील आरोपी हे पोलीसांपासुन लपण्यासाठी इंन्स्टाग्राम कॉलचा वापर करत असत. दाखल गुन्हयातील आरोपी यांनी बँक अंकाउट उघडण्यासाठी तात्पुरता भाडेकरार केला होता व त्याआधारे विविध बँकेमध्ये खाती उघडली आहेत. दाखल गुन्हयातील आरोपी बबलु यादव हा पाहिजे आरोपीचे सांगणेवरुन वेगवेगळया एटीएम मधुन पैसे काढून पाहिले आरोपी यास देत असत. तसेच आरोपी रणजीत मुन्नालाल यादव याने त्याच्या पंजाब नॅशनल बँक अकाऊंटवर गुन्हयातील ३६,९६,६७२/- रु घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास रविकिरण नाळे, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे करीत आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, सारंग आव्हाड अपर पोलीस आयुक्त, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार पोलीस उपआयुक्त, परिमंडळ -०३ अति. कार्य. गुन्हे, डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे १ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउनि. सागर पोमण, पोउपनि वैभव पाटील, पोलीस अंमलदार सुभाष पाटील, दिपक माने, कृष्णा गवळी, अभिजीत उकिरडे, संतोष सपकाळ, दिपक भोसले, नितेश बिचेवार, श्रिकांत कबुले, अतुल लोखंडे, माधव आरुटे, ज्योती साळे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.
आवाहन…
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ”मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन संपर्क साधणा-या व्यक्ती परदेशी नागरीक असल्यास समक्ष भेटुन, पुर्ण चौकशी करुन त्यांचेशी आपले वैयक्तिक माहिती शेअर करावी. तसेच मेट्रोमोनिअल वेबसाईटवरुन संपर्क करुन कोणी पैशांची मागणी करत असेल तर सदर व्यक्तीबाबत सायबर पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे तक्रार नोंद करावी”.











