न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२५) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थेचे १२० एसपीओ सुरक्षा स्वयंसेवक हे जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास दर वर्षी प्रमाणे बंदोबस्तास प्रशासनास सहकार्य करणार आहेत. त्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त सारंग आवाड यांची भेट पीएनएसकेएस महाराष्ट्र राज्य संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्तालय कार्यालय येथे घेतली.
या प्रसंगी संदर्भ क्रमांक PNSKS/06/2025/01 दिनांक 05/06/2025 हे पालखी बंदोबस्त कार्यक्रम नियोजन पत्र त्यांना समितीच्या वतीने देण्यात आले. या प्रसंगी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा सन्मान करण्यात आला व पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. समितीचे राज्य अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील, विभाग प्रमुख विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, गौरी सरोदे, वर्षा भारंबे, किरण चौधरी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” यंदाचे सुरक्षा समितीचे पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे २३ वे वर्ष असून.वैष्णवांचा देहू ते पंढरपूर असा वारीचा प्रवास आरोग्यदायी व सुरक्षित होण्यासाठी समितीचे एसपीओ, सुरक्षा स्वयंसेवक पोलीस विभागास सहकार्य करणार आहेत.
विभाग अध्यक्ष विशाल शेवाळे म्हणाले,” यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात अधिक सुसूत्रता येण्यासाठी पोलीस आयुक्तालय परिमंडळ १ ते ३ तसेच वाहतूक पोलीस पोलीस उपआयुक्तालय येथेही संस्थेच्या वतीने माहिती पत्र आले असून यंदाचा पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासनासोबत सुरक्षा समितीचे सदस्य सक्रिय सहभागी असणार आहे.”
















