न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२५) :- मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना सांडपाण्याचा पुर्नवापर करणे बंधनकारक आहे. शहरातील १८४ सोसायट्यांमधील मैलासांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बंद आहेत. महापालिकेने अशा हाऊसिंग सोसायटीचे नळजोड तोडत आहे. आत्तापर्यंत पंधरा हाऊसिंग सोसायटीचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत. ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
वीस हजार चौरस मीटर, त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना, १०० सदनिका असलेल्या दीड हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज २० हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या हाऊसिंग सोसायटी व इतर संस्थांना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. शहरातील ४५६ पैकी १८४ हाऊसिंग सोसायट्यांत एसटीपी बंद आहेत. अशा सोसायटीचे नळजोड तोडण्यात येत आहेत.
सोसायट्यांनी एसटीपी सुरू करावेत. नळजोड खंडित करण्याची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग…















