न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२५) :- स्टंट करत असताना पुलावरून तोल जाऊन नदीपात्रात पडलेल्या १६ वर्षीय मुलाला जिवनदान मिळाले. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी अतिशय धाडसी प्रयत्नांतून सुखरूप बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी पिंपरी परिसरात घडली.
वेदांत बोत्रे (वय १६) असे नदीत पडलेल्या मुलाचे नाव आहे. तो फोटोसाठी स्टंट करत असताना तोल गेल्यामुळे तो सरळ नदीत पडला. नदीत पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होता, तसेच नदी पात्रात पूल बांधणीसाठी असलेल्या काँक्रिट कॉलममध्ये तो अडकला होता. या घटनेनंतर नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे जवान बोटच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी संयम आणि कौशल्य दाखवत वेदांतला सुखरूप बाहेर काढले आणि त्यास त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.
या कामगिरीत गौतम इंगवले, विकास नाईक, रुपेश जाधव, फायरमन प्रथमेश भोसले, विशाल चव्हाण, ट्रेनी फायरमन आविष्कार पिसाळ आदींचा सहभाग होता.


















