न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर मतदारसंघातून कोल्हे यांना विजयी करण्याची जबाबदारी घेतली होती. विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नियोजनबद्ध प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना २५ हजार ६९७ मतांची आघाडी दिली.
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळायचे. तर, विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील यांना मताधिक्य मिळायचे.
या दोन्हीही नेत्यांमध्ये फिक्सींग असल्याचा आरोप पक्षातील नेते आणि कार्यकर्ते करायचे. परंतु, तो परिपाठ वळसे पाटील यांनी डॉ. कोल्हे यांना निर्णायक आघाडी देऊन मिटवून टाकला आहे, असे शिरूरच्या निकालावरून दिसते.















