न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा दोन लाख मतांनी पराभव केल्याने पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
दरम्यान, पार्थची ज्यांच्या खांद्यावर प्रचाराची धुरा टाकली होती. त्यांना सपशेल अपयश आल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जाम संतापले असून, शहर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांची लवकरच उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे समजते.











