न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वडगाव मावळ (दि. 04 जुलै 2025) :- मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव फाटा येथे कारला आग लागून ती जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कार पुण्याच्या दिशेने जात होती. इंजिनमधून अचानक धूर आल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन त्यातून उड्या मारला. त्यानंतर कारने पेट घेतला.
आगीची माहिती मिळताच वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
तेजस सूर्यकांत सहक (रा. निंभोरे, ता. फलटण, जि. सातारा) हे गाडीचे मालक असून, ते एमआयडीसी तळेगाव येथून हिंजवडीला मित्राला सोडण्यासाठी चालले होते. वडगाव फाटा येथे मोटारीच्या इंजिनमधून अचानक धूर आल्याने त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली व गाडीतून उड्या मारल्या. त्यानंतर गाडीला आग लागून जळून खाक झाली.
या घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वडगाव पोलिस ठाण्याचे अंमलदार खोपडे, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, जिगर सोळंकी, शत्रुघ्न रासनकर, सर्जेस पाटील, भास्कर माळी, मयूर चौधरी यांनी बचावात सहकार्य केले.