न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. 05 जुलै 2025) :- पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात राज्यातील पहिल्या ‘वेस्ट टू वंडर वर्ल्ड थीम पार्क’च्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पार्कमध्ये जगातील सात आश्चर्यासह एकूण १७ ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती साकारण्यात येत आहेत, विशेष म्हणजे, या निर्मितीसाठी टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर केला जात असून ११ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
हे थीम पार्क पूर्णत्वास आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये नवे पर्यटनस्थळ निर्माण होणार आहे. पर्यटनस्थळाचा भाग होणाऱ्या पार्कची रचना टाकाऊपासून टिकाऊ या पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून करण्यात येत असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रकल्प आदर्श ठरणार आहे. यामुळे पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना वेगळी पर्यटन अनुभूती मिळेल.
लवकरच हे पार्क नागरिकांच्या भेटीसाठी खुले केला जाणार आहे. कचऱ्याचा वापर करून तयार होणारे वेस्ट टू वंडर पार्क पर्यातरणपूरक उपक्रमाचे उत्तम उदाहरण ठरेल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे
या प्रतिकृतींचा समावेश…
ताजमहाल, आयफेल टॉवर, बुर्ज खलिष्ठा, लीनिंग टॉवर ऑपा पिसा, सिडनी ऑपेरा हाऊस, अजिंठा लेणी, ला सागराडा फैमिलीया, चिचेन इत्झा, पेट्रा ऑफ जोर्डन, कोलोसियम ऑफ रोम, विग वेन ऑफ लंदन, अंगकोर घट ऑफ कंबोडिया, हंपीचे स्थ, स्टॅब्यू ऑफ लिबर्टी, देव्ही फाउंटन, माउंट रश्मीर…
या प्रकल्पाचा उद्देश ‘कचऱ्याला कलात्मकतेने रूप देणे’ असा असून त्यामार्फत टाकाऊ साहित्य वापरून विविध भव्य आणि आकर्षक शिल्प तयार केली जात आहेत. यात जुनी वाहने, लोखंडी पाइप्स, साखळ्या, नट-बोल्ट्स आदी साहित्याचा वापर केला आहे. या कलाकृर्तीचे स्वरूप जागतिक दर्जाच्या वास्तू व शिल्पांवर आधारित असेल,
– जितेंद्र देवकर, उपअभियंता, महापालिका…
हा महाराष्ट्रातील पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प असेल. तो दोन महिन्यांत नागरिकांसाठी खुला होणार आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून, पर्यटनवृद्धीसाठी मदत होणार आहे.
नाना काटे, माजी नगरसेवक…