न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- रमजाननिमित्त आज शनिवार (दि. २५) रोजी आमदार महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि मित्र परिवारातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला मुस्लिम समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.
भोसरीतील इंद्रायणी मंगल कार्यालयात शनिवारी सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, अखिल भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील, भोसरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे उपस्थित राहणार आहेत.
तसेच शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, मुस्लिम महासंघाचे अजहर सिकंदर खान, फारुक ईनामदार, झिशान सय्यद, जहिर सिकिलकर, अस्लम पठाण, हाजी गुलामरसुल सय्यद, हबिबभाई शेख, खाजाभाई शेख आदी उपस्थित राहणार आहेत. मुस्लीम नागरिकांनी इफ्तार पार्टीला उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.











