न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- पेट्रोल भरल्यानंतर पैसे मागितल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्यांनी कर्मचाच्याकडील ९ हजारांची रोकड पळवुन नेली. वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोलपंपावर शनिवारी (दि. १८ ) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांत तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. कार्तिक बन्सी या तरुणाने फिर्याद दिली होती.
पोलिसांनी पवन गिते, दत्ता सूर्यवंशी, बाळा ऊर्फ विशाल मडाणे, रोहित पाखरे आणि अभिजित दौड या पाच जणांना अटक केली आहे. तर, अन्य एकाचा शोध सुरु आहे.











