न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- सराफी पेढीत तोंडाला मास्क बांधलेल्या दोघांनी पिस्तुलाच्या धाकाने पाच लाखांच्या दागिन्यांचा ट्रे चोरून नेला. निगडी येथील सचिन ज्वेलर्समध्ये शुक्रवारी (दि. २४) रोजी दुपारी हा प्रकार घडला. सराफाने चोरट्यांचा प्रतिकार केल्याने दोघांनी पळ काढला.
नितीन सुरेश ओसवाल (वय ४५, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. निगडी गावठाण येथे ओसवाल यांची सचिन ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघेजण खरेदीच्या बहाण्याने तेथे आले. तोंडाला मास्क बांधून बंदुकीच्या धाकाने पेढीतील दोघा कामगारांना धमकावले. ट्रे मधील १७९ ग्रॅमचे ५ लाख ६५ हजाराच्या दागिन्यांसह पळ काढला. निगडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.











