न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चिंचवड परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करीत हातगाड्या, टेम्पो व विक्री साहित्य जप्त केले. ही कारवाई नुकतीच शनी मंदिर रस्ता, पूर्णानगर या परिसरात करण्यात आली.
कारवाईत ३ टेम्पो, ८ हातगाड्या, १५ फूट कॅरेट, ३ अॅल्युमिनियम फ्रेम, २ दरवाजे आदींसह विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेले साहित्य नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडिमयमधील गोदामात जमा करण्यात आले आहे. कारवाईत १ कनिष्ठ अभियंता, ३ बिट निरीक्षक, १ अतिक्रमण निरिक्षक, पथकाचे कर्मचारी व पोलिस पथक हजर होते.











