न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत २१ पैकी तब्बल १९ जणांचे डिपॉझिट (अनामत रक्कम) जप्त झाले आहे. ही एकूण रक्कम ३ लाख ७५ हजार इतकी आहे.
या मतदारसंघात एकूण २९ जणांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यातील ८ जणांनी माघार घेतली. रिंगणात एकूण २१ उमेदवार राहिले होते. त्यापैकी तब्बल १९ जणांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यात बहुजन वंचित आघाडीचे राजाराम पाटील, बहुजन समाज पार्टीचे संजय कानडे यांच्यासह जगदीश सोनवणे (क्रांतिकारी जयहिंद सेना), जया पाटील (आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडिया), पंढरीनाथ पाटील (बहुजन मुक्ती पार्टी), प्रकाश महाडिक (भारतीय नवजवान सेना), मदन पाटील (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), संतोष राजाराम पाटील (वंचित बहुज आघाडी), सुनील गायकवाड (बहुजन रिपब्लिकन पार्टी) यांचा समावेश आहे.
तसेच अजय लोंढे, अमृता आपटे, नवनाथ दुधाळ, प्रशांत देशमुख, बाळकृष्ण घरत, राकेश चव्हाण, राजेंद्र काटे, विजय रंदिल, सुरज खंडारे, सुरेश तौर, डॉ. सोमनाथ पोळ या सर्व अपक्षांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. खुल्या गटातील उमेदवारांना २५ हजार रुपये व मागासर्गीय उमेदवाराना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट आहे, असे एकूण ३ लाख ७५ हजार रुपये निवडणूक आयोगाने जप्त केले आहेत. तर, बारणे व पवार यांचे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे डिपॉझिट परत केले जाणार आहे.











