न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळवडे (दि. ०७ जुलै २०२५) :- तळवडेतील त्रिवेणीनगर चौकाजवळ स्विप्ट गाडी आडवी लावून तिघांनी वाहन चालकाचा रस्ता आडवला. गाडीतून उतरून तिघांपैकी एकाने हातातील रिव्हॉल्वर वाहनातील अनिकेतच्या डोक्यास लावून रिव्हॉल्वरच्या मुठीने त्याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले.
गाडीतील फिर्यादी तरुणाच्या कमरेस लावलेला रिव्हॉल्वर हा आरोपी गाडी चालकाने हिसकावून घेतला. तसेच त्या गाडी चालकाबरोबर गाडीतून खाली उतरलेल्या तिस-या इसमाने फिर्यादीच्या गळयातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेतली आहे.
हा प्रकार फिर्यादी हे त्यांचे मित्र प्रणीकेत जगताप याच्यासोबत वाढदिवस साजरा करून मारुंजीतून परत घरी येत असताना (दि.०६) पहाटे १.२५ वा. चे सुमारास घडला. फिर्यादी विकी विजय भालेकर (वय ३६ वर्ष) यांनी आरोपी तीन अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















