न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. ०७ जुलै २०२५) :- बांधकाम चालू असलेल्या घराच्या ठिकाणी येवून घराच्या दरवाजावर लाथा मारून सहा जणांनी कंपनीचे ट्रान्सपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणून फिर्यादीच्या भावाला शिवीगाळ केली. तसेच एकाने त्याच्या मोबाईलवरून फिर्यादीस कंपनीचे काम करू नको म्हणून धमकी दिली.
ही घटना (दि. ०४) रोजी सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास शेलपिंपळगाव, ता. खेड येथे घडली. फिर्यादी अक्षय अंकुश इंगळे (वय ३२ वर्षे) यांनी आरोपी १. रोहन दौडकर, २. निलेश दौडकर ३. त्यांचेसोबत इतर ४ इसम (रा दौडकरवाडी रोड, शेलपिंपळगाव) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप मोकाट आहेत.
















