न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- मावळात सेनेचे श्रीरंग बारणे यांना विजय मिळाल्याबद्दल शहर शिवसेनेतर्फे आकुर्डी कार्यालयात जल्लोष करण्यात आला. तसेच बारणे यांचा सत्कार करण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेने खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा २ लाख १४ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला.
त्यांच्या विजयाचा जल्लोष शिवसेना आकुर्डी मध्यवर्ती कार्यालयात फटाके फोडून व पेढे वाटून साजरा करण्यात आला. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच आपल्याला विजय मिळाल्याचे बारणे यांनी सांगितले. यावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, ऊर्मिला काळभोर, नगरसेवक प्रमोद कुटे, रेखा दर्शिले अनंत कोर्हाळे, रोमी संधू, तुषार नवले, अनिता तुतारे, अमोल निकम आदी उपस्थित होते.
बारणे यांना मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छ्या दिल्या. तसेच आमदार प्रशांत ठाकूर, लक्ष्मण जगताप, मनोहर भोईर, गौतम चाबुकस्वार, बाळा भेगडे यांनीही बारणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.











