न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६८ हजार ८५९ मतांपैकी १५ हजार ५४८ ‘नोटा’ ची (नन ऑफ दी अबाऊ) संख्या आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत एकूण ११ हजार १८६ ‘ नोटा ‘ ची मते होती. यंदाची ही मते ४ हजार ३३० ने अधिक आहेत.
त्यात ३२ टपाली मतांनी भर घातली आहे. तर, एकूण २१ पैकी १८ उमेदवारांना ‘ नोटा ‘ पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. मावळ लोकसभेत एकूण २० लाख ९७ हजार ४०५ मतदार आहेत. त्यापैकी १३ लाख ६८ हजार ५८९ जणांनी मतदान केले. त्यापैकी तब्बल १५ हजार पेक्षा अधिक जणांनी ‘ नोटा ‘ चे बटन दाबले आहेत. याचा अर्थ त्या लोकांना २१ उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नव्हता.











