न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२५) :- अज्ञात इसमाने घातक शस्त्राने तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा करुन त्याचा खुन केला होता. हा प्रकार (दि. ०४ ते दि. ०५) दरम्यान पठारेमळा च-होली येथील एका सोसायटीच्या सेक्युरिटी केबीन समोर उघडकीस आला होता. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
धनु दादा लकडे (वय ३३ वर्षे, रा. आळंदी रोड, पुणे मुळगाव मानकोबा वाडी ता. दौंड जि. पुणे) अस मयताचे नाव आहे. सोमनाथ दादा लकडे (वय १९ वर्षे, धंदा- मेंढपाळ, रा. आळंदी रोड, पुणे मुळगाव- मु.पो. मानकोबा वाडी ता. दौंड जि. पुणे) असे अटक केलेल्या सख्या भावाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस व गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांनी सी.सी.टी.व्ही. फुटेज व संशयीतांचे मोबाईल नंबर प्राप्त करुन तांत्रिक विश्लेषण केले. खास बातमीदारामार्फत माहिती काढली असता सदर आरोपी हा मयत इसमाचा सख्खा भाऊ असल्याची माहिती पोलिसांना समजली. सोमनाथचे मयताच्या पत्नी बरोबर असलेल्या अनैतिक संबंधामध्ये मयत धनु अडचण करीत असल्याने खुन केल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेतला असता तो रहाते घरी, काळे कॉलनी पाण्याचे टाकी शेजारी, फेरीस्त आळंदी रोड, पुणे येथे दुपारी १ वा. मिळुन आला. त्यास ताब्यात घेतले. दाखल गुन्हयाबाबत आरोपी कडे चौकशी करता आरोपी स्वतःच्या बचावा करीता व पोलीसांची दिशाभुल करण्यासाठी फिर्यादी म्हणुन फिर्याद दिली होती. तसेच आरोपी याचे मयताची पत्नी हीच्या बरोबर अनैतिक संबंध आहे. मयत धनु लकडे हा अनैतिक संबंधाला अडचण ठरत असल्याने व तसा मयत धनु लकडे यास संशय असल्याने आरोपीने दाखल गुन्हा केले असल्याचे कबुल केले आहे.
तसेच दाखल गुन्हयातील पाहिजे महिला आरोपी हिस खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी यांची वैद्यकिय तपासणी करुन पुढील तपास कामी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे यांना रिपोर्टने सादर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त एस.डी. आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-१ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, राजेंद्र पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पोलीस उप-निरिक्षक समिर लोंढे, पोलीस उप-निरिक्षक, सुनिल भदाने, स.पो. फौ पी.पी. तापकीर, स.पो. फौ. एस.एन. ठोकळ, स.पो.फौ. व्ही.एच. जगदाळे, स.पो.फौ. ए. पी. गायकवाड, पो.हवा २९२० जी.एस. मेदगे (तात्रिक विश्लेषण), पो. हवा ४८० जी.डी. चव्हाण, पो.हवा १६०४ एस. डी. चौधरी, पो.हवा ९५६ व्ही.टी. गंभीरे, पो. हवा. १७२९ एस.पी. बाबा (तांत्रिक विश्लेषण), पो.हवा. १७२८ एन.बी. गेंगजे, पो.हवा. १७८८ व्ही.डी. तेलेवार, पो. हवा. ३०३९ दळवी, पो.शि. २०८४ व्ही.एन. वेळापुरे, पो.शि २८४९ एस.टी. कदम, पो.शि २३८४ टी.ई. शेख, पो.शि. २८१२ आर. के. मोहिते, पो.शि. २९६४ डी.व्ही.गिरी, पो.शि. २८४९ एस.पी. घारे सर्व गुंडा विरोधी पथक व पो.हवा. प्रमोद गोंडाबे, पो.हवा. प्रदीप पोटे, पो.हवा. किरण जाधव खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं.चिं. व टी.ए.डब्ल्यु विभाग, पिंपरी चिचवड यांनी केली आहे.










