न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील निवासी अग्रवाल समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विशेष प्रावीण्य मिळविणार्यांचा गुणगौरव सोहळा चिंचवड़ येथील अग्रसेन समाज भवन येथे ३० मे २०१९ रोजी सांयकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या माध्यमिक – उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत तसेच ग्रॅजुएट व पोस्ट ग्रॅजुएट, मेडिकल, इंजीनियरिंग परीक्षा आणि अन्य डिग्री डिप्लोमा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविणार्या अग्रवाल समाजाच्या विद्यार्थ्यांचा स्मृति चिन्ह आणि प्रशस्ति पत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. ह्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन उद्योजक व एस्सेन ग्रुप ऐश्वर्यम ब्रँडचे चेअरमन भीमसेन अग्रवाल व वसंत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रेमचंद्र अग्रवाल यांच्यावतीने करण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात निवासी अग्रवाल कुंटुंबास भीमसेन अग्रवाल आणि प्रेमचंद्र अग्रवाल यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या गुणवंत मुलांचे नाव त्वरीत नोंदवावे. नाव नोंदणीसाठी ९६७३९८८७७०/ ९८२२८३६०५६ / ७०२०३१६००९/ ७०२०२०६२८४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
तसेच या गुणगौरव सोहळ्यात निशुल्क हेल्थ चेकअप शिबीराचे आयोजन भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमास येणार्या सर्वांचे येथे मोफत हेल्थ चेकअप केले जाणार आहे, अशी माहिती ओम हॉस्पिटलचे डॉक्टर अशोक अग्रवाल यांनी दिली.











