- महापालिकेत विलीनीकरणाला मुख्यमंत्र्यांची तत्त्वतः मान्यता..
- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश नाहीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १० जुलै २०२५) :- केंद्र सरकारने अखेर सर्व कॅन्टोन्मेंट झोनच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. महापालिका हद्दीत असलेल्या पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
या समावेशाबाबत मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत संरक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार पुढील तीन महिन्यात विलीनीकरणाची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे माहिती मिळत आहे. महापालिका हद्दीच्या लगत असूनही या भागातील अनेक नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलिनीकरणासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा होते.
सर्व कन्टोनमेंट झोनच्या विलीनीकरणाला मान्यता..
देहू रोड वगळता देशभरातील सर्व कन्टोनमेंट क्षेत्रांच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे नागरी सुविधा, स्थानिक विकास, कर रचना आणि प्रशासनिक अधिकार यामध्ये मोठा बदल होणार आहे. देहूरोडला का वगळलं गेलं, यावर मात्र अजून स्पष्टता नाही.
















