न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२५) :- “तु पोलीसांसोबत येरवडा जेल येथे जाऊन विजय तलवारे व बाँन्डला का ओळखलेस,” अशी विचारणा करीत दुचाकीवरून आलेल्या चौघांनी एका विधीसंघर्षीत बालकाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्याने मी नव्हतो असे म्हणताच कंबरेला लावलेला कोयता काढुन “थांब तुला खलासच करतो,” असे म्हणुन कोयत्याने तीन वेळा त्याच्या डोक्यात मारुन त्याला जबर जखमी केले.
तसेच आरोपी क्र २ याने त्याचेकडील कोयता हवेत फिरवून आरडाओरडा करुन “कोणी आमचे मध्ये आले तर, त्याला खलास करु.” असे म्हणुन तेथे जमलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना (दि.०८) शिवशक्ती कॉलनी, श्रीनगर, रहाटणी येथे घडली.
याप्रकरणी विधीसंघर्षीत बालक याने आरोपी १) सुनिल शेट्टी ऊर्फ सुनिल ठाकुर वय २५ वर्षे अंदाजे, २) सुरज ऊर्फ पिल्या भालचंद्र शिंदे, वय १८ वर्षे, १ महिना, राहटणी, ३) शिव-या ऊर्फ शिवराज ज्ञानदेव चव्हाण वय १९ वर्षे रा. नखातेवस्ती, रहाटणी, ४) चंग्या ऊर्फ कृष्णा शामराव धाईजे वय २० वर्षे रा. रहाटणी यांच्या विरोधात फिर्याद दिली असून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत आहेत.











