- टोळक्याकडून दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२५) :- कोयते हवेत फिरवुन ‘आम्ही इथले भाई आहोत, कोणीमध्ये आले तर कापुन टाकु’ अशी धमकी देत एका टोळक्याने काळेवाडीत लोकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. तसेच ‘तुम्ही भाई झालात काय, तु निट रहा नाहीतर तुझा मर्डर करीन’ असे म्हणुन “यांना आज सोडायचे नाही, ऋत्याचा मर्डर करायचा” असे बोलून दोघांवर कोयत्याने हल्ला चढवीत त्यांना गंभीर जखमी केले आहे.
हा प्रकार (दि ०८) रोजी दुपारी दोनच्या सुमारास जिवन चौक, काळेवाडी येथे घडला आहे.
ऋतुराज निकम (वय-१९ वर्षे, काळेवाडी) याने आरोपी १) अभिषेक श्यामराव निंबाळकर वय २१ वर्षे रा. नढेनगर काळेवाडी, २) गोटया पवार (वय ३० वर्षे), ३) अनुज निनाजी गोळे (वय २१ वर्षे रा. नढेनगर काळेवाडी), ४) सुजल शिवाजी कोरे (वय १९ वर्षे रा. नढेनगर, काळेवाडी) ५) आयुष सुनिल खैरे (वय २० वर्षे रा. काळेवाडी), ६) हर्ष विनोद महाडीक (वय २० वर्षे रा. नढेनगर काळेवाडी), ७) सागर रमेश शिंदे (वय २५ वर्षे रा. काळेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली असून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.











