न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२५) :- फक्त ८ दिवसाला ३ ते ३.५ टक्के व महीन्याला १० टक्क्यापेक्षा जास्त खात्रीशीर परतावा देत असल्याचे अमिष दाखवुन महिलेसह दहा जणांची १,३४,४९,००० रु. ची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे.
फॉरेक्स ट्रेडींग व शेअर ट्रेडींगकरीता महिलेला सुरुवातीला किरकोळ परतावा देत त्यांना २४,९९,००० रूपये गुंतवणुक म्हणुन आरोपी यांनी वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर भरण्यास भाग पाडले. त्यांची फसवणुक केली. याप्रकरणी महिला फिर्यादीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१) नवनाथ जगन्नाथ अवताडे (वय ४८ वर्षे), २) राहुल शामराव काळोखे, ३) गौरव देविदास सुखदेव, ४) प्रसाद बाजीराव देशमुख, ५) विनायक ज्ञानदेव मराठे, ६) प्रसाद प्रकाशराव कुलकर्णी, ७) फंड मॅनेजर अगस्त मिश्रा, ८) एजंट सतिष जगताप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.











