न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 14 जुलै 2025) :- एजन्सीच्या टेम्पोमधुन ग्राहकांना विक्री करण्यासाठी आणलेला भारत कंपनीचा गॅस चा अनधिकृतपणे वापर केला.
लोकांच्या सुरक्षततेची काळजी न घेता गॅस भरलेल्या सिलबंद टाक्यामधुन मोकळया सिलेंडरमध्ये नोझलच्या सहायाने गॅस काढुन चोरी करताना आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.
लोकेंद्र ख्मान सिंग (वय २५ वर्षे रा. जाधववाडी, चिखली) असं अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार (दि.१३) सकाळी ११.३० वा चे सुमारास खंडेवस्ती, भोसरी याठिकाणी घडला. भाऊसाहेब यादव गायकवाड पोहवा ब.नं. ७३९, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.














