न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. 14 जुलै 2025) :- पिंपरी चिंचवड पोलीसांनी संघटीत गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सोजवळ व मणियार या टोळयांवर “मोका अंतर्गत कारवाई केली आहे.
सन २०२५ मध्ये आजपर्यंत पिंपरी चिंचवड पोलीसांनी १४ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण ६७ आरोपींवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
जुलै २०२५ मध्ये पुढील नमुद दोन गुन्हयांतील एकुण ०७ गुन्हेगारांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं २४६/२०२५ बी.एन.एस. ३०९ (६), ३५१ (३), ३५२, ३(५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा. पोलीस कायदा कलम ३७ (१) (३)१३५ या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ, वय २६ वर्षे, रा. सर्वे नंबर २४, कमळाबाई बहिरट चाळ, बोपोडी, पुणे (टोळी प्रमुख) २) शैलेश विकास सरोदे, वय २० वर्षे, रा. सुभाष छाजेड नगर, बोपोडी, पणे ३) साहील सलीम शेख, वय २० वर्षे, रा. इंदिरानगर वसाहत, हनुमान मंदीराजवळ, खडकी बाजार, पुणे ४) विधी संघर्ष बालक रा. बोपोडी, पुणे. यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०९ गंभिर गुन्हे केल्याची नोंद आढळुन आलेली आहे.
२) चिंचवड पोलीस ठाणे गु.रजि.नं. १०१/२०२५ भा. न्याय. संहिता कलम ३०९ (४), ३(५), ३१७ (४) या गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे (१) परवेज ऊर्फ सोनू जावेद मणियार, वय २४ वर्षे, रा. शिवाजीनगर, नाशिक, ता.जि. नाशिक (टोळी प्रमुख) २) राज सखाहरी गायकवाड, वय १९ वर्षे, रा. शिवाजीनगर, नाशिक, ता.जि. नाशिक ३) विलास प्रमोद विसपुते, वय ४० वर्षे, रा. खुटवड नगर, फ्लॅट नं. १०, सर्वेश्वर प्लाझा, अंबड लिंक रोड, नाशिक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १८ गंभिर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे
वरील दोन्ही टोळी प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी हिंजवडी, सांगवी, चिंचवड, खडकी, सिंहगड, भारती विदयापीठ, इंदिरानगर नाशिक, गंगापुर नाशिक, सरकारवाडा नाशिक, अंबड नाशिक पोलीस स्टेशन हद्दीत गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, फसवणुक, चोरी, बेकायदेशिर अग्निशस्त्रे व हत्यार जवळ बाळगणे, अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे केले आहेत.
प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
सदर टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायदयासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला.
सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करुन नमुद दोन्ही गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (४) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार (गुन्हे), पोलीस उप-आयुक्त विशाल गायकवाड (परि-०२), सहा. पोलीस आयुक्त विशाल हिरे (गुन्हे), यांच्या मार्गदशनाखाली तत्कालीन वपोनि कन्हैया थोरात (हिंजवडी पोस्टे), वपोनि विजय ढमाळ (मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाख), वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप रायण्णावार (पी.सी.बी गुन्हे शाखा), पोउपनि गोसावी (मालमत्ता विरोधी पथक, गुन्हे शाखा), पोहवा ओंकार बंड (हिंजवडी पोस्टे), पोहवा सचिन चव्हाण, पोहवा व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, यांच्या पथकाने केली आहे.


















